Sangli News saam tv
महाराष्ट्र

Sangli News: १८ कोटींच्या व्हेल माश्याची उलटी पुन्हा जप्त; मुख्य सूत्रधारास अटक

१८ कोटींच्या व्हेल माश्याची उलटी पुन्हा जप्त; मुख्य सूत्रधारास अटक

विजय पाटील

सांगली : सांगली पोलिसांनी व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी मुख्य सूत्रधाराला सिंधुदुर्गच्या मालवणमधून (Malvan) अटक केली आहे. यावेळी तब्बल १८ कोटी ६० लाख किंमतीची १८ किलो व्हेल माश्याच्या उलटीचा पदार्थ जप्त केली आहे. (Maharashtra News)

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून काही दिवसांपूर्वी सांगली (Sangli) शहरामध्ये व्हेल माशाचे उलटी पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ५ किलो ७०० ग्रॅम वजनाचे व्हेल माश्याच्या उलटीचा पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत बाजारामध्ये पावणे सहा कोटी रुपये असल्याचे समोर आले होतं.

उलटीचे पदार्थ सापडल्याचा बनाव

अटक करण्यात आलेल्या दोघांकडून तपासामध्ये या तस्करी प्रकरणी मुख्य सूत्रधाराचे नाव समोर आल्यानंतर पथकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण येथून निलेश रेवंडकर यास अटक करत त्याच्याकडून १८ किलो वजन असलेले व्हेल माश्याच्या उलटीचे पदार्थ हस्तगत करत जप्त करण्यात आले आहेत. सांगलीमध्ये आपल्या साथीदारांना अटक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर निलेश याने मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर व्हेल माश्याच्या उलटीचे पदार्थ सापडल्याचा बनाव करत ते पोलीस मालवण पोलिसांकडे जमा केले होते. सदरची माहिती मिळाल्या नंतरच सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गतीने तपास करत बनवा करणाऱ्या नीलेश याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT