Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : वीज अंगावर पडून वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यू; अन्य दोन जखमी

Sangli News : शिराळा तालुक्यातल्या गिरजवडे आणि मिरज तालुक्यातल्या चाबुकस्वारवाडी या ठिकाणी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडल्याची घटना घडली

विजय पाटील

सांगली : वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने दोघांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासोबत दोन ठिकाणी वीज पडून दोन जणांच्या मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. 

सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या गिरजवडे आणि मिरज तालुक्यातल्या चाबुकस्वारवाडी या ठिकाणी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडल्याची घटना घडली. यात शिराळाच्या गिरजवडे येथे जनावरे चारण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण शेळके (वय ५७) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर दुसऱ्या घटनेत मिरज तालुक्यातल्या चाबुकस्वारवाडी येथे शेतात विहीर खुदाई करणाऱ्या कामगारांच्या अंगावर वीज पडली. यात एका कामगाराचा मृत्यू झाला. तर सोबत असलेले २ कामगार जखमी झाले आहेत. सुभाष नाईक (वय ४२) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.

पाच दिवसात ४ जणांचा मृत्यू 

मागील आठवडाभरापासून अवकाळी पाऊस होत आहे. पावसासोबत वारा व विजा देखील होत आहेत. अचानक येत असलेल्या या पावसामुळे शेतातील मजूर कामावर असतात. दरम्यान सांगली जिल्ह्यामध्ये (Lightning Strike) वीज पडल्याच्या घटना घडत आहेत. यात मागील पाच दिवसात वीज अंगावर पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan Skin Care: सारा अली खानची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नागपूरच्या बारमध्येच शासकीय काम; उपविभागीय अभियंत्याची चौकशी सुरू

भाषेवरून लोकसभेतच गदारोळ, निशिकांत दुबेंचा 'हिंदी' हट्ट, पाहा काय घडलं? |VIDEO

SCROLL FOR NEXT