Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: पाच जिल्ह्यातून मोटरसायकलींची चोरी; ८ दुचाकींसह चोरटा ताब्‍यात

पाच जिल्ह्यातून मोटरसायकलींची चोरी; ८ दुचाकींसह चोरटा ताब्‍यात

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या एका अट्टल चोरट्यास सांगलीचे (Sagnli) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून आठ दुचाकींसह दोन लाख ४० हजारांचा मुद्देमाल (Crime News) जप्त करण्यात आला आहे. करण चव्हाण (वय 26) असे या संशयीताचे नाव आहे. (Maharashtra News)

सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचा तपास सुरू असताना विश्रामबाग परिसरातील १०० फुटी रोडवरील धामणी चौक या ठिकाणी चोरीतील मोटरसायकल विक्री करण्यासाठी एक तरुण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. यानुसार सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या करण चव्हाण (रा. नागज, ता. कवठेमहांकाळ) याला ताब्यात घेऊन त्‍याच्याकडे सदरच्या गाडीची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.

अडीच लाखाचा मुद्देमाल जप्‍त

मात्र कागदपत्रे नसल्याचे सांगितल्यानंतर त्याची सकल चौकशी केली असता सदरची दुचाकी त्यांनी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून त्याच्या ताब्यातल्या आठ दुचाकी जप्त करत सहा गुन्हे उघडकीस आणत दोन लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer: 'Operation Tiger' पूर्ण, आता पुढे काय? श्रीकांत शिंदेंकडून नव्या ऑपरेशनचे संकेत,ठाकरे नेत्यांची गळती रोखू शकतील?

Chips side effects: भूक लागली की चिप्स खाताय? पाहा तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक ठरतेय ही सवय

IAS transfer : राज्यात पुन्हा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाची कुठे झाली नियुक्ती

Shraddha Kapoor - Eetha : श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाला विरोध; नाव बदलण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Coaching Centre Fire : अग्नितांडव! कोचिंग क्लासला भीषण आग; १५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT