Jat Panchayat Samiti Saam tv
महाराष्ट्र

Zilha Parishad School : पंचायत समितीच्या दारातच भरली शाळा; काय आहे कारण?, तांबेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन

Sangli news : जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांचे स्वागत होत असताना जत तालुक्यातील तांबेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच शाळा भरवण्यात आली

विजय पाटील

सांगली : राज्यभरात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे शाळेत स्वागत करत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था असल्याने यामुळे शाळा इतरत्र भरवावी लागत असल्याने जत तालुक्यातील तांबेवाडी जिल्हा परिषदेची शाळा पंचायत समितीच्या दारातच भरविण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीने हे अनोखे आंदोलन केले आहे. 

राज्यातील सर्व शाळा १६ जूनपासून सुरु झाल्या आहेत. प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांचे स्वागत होत असताना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तांबेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच शाळा भरवण्यात आली. शाळेचे तत्काळ निर्लेखन करून नवीन इमारत द्या; अशी मागणी करत अधिकार्‍यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. 

वर्षभर भरविली मंदिरात शाळा 
दरम्यान तांबेवाडी जिल्हा परिषद शाळेची अवस्था दयनीय आहे. मुलांच्या जीवितास धोका निर्माण होईल; अशी ही इमारत मोडकळीस निघाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी शाळेच्या निर्लेखानाचा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे. मात्र अध्याप यावर प्रशासनाने दखल घेतलेली नाही. शाळा कधी पडेल सांगता येणे शक्य नसल्याने मंदिरात शाळा भरवली जात आहे. हीच परिस्थिती नवीन वर्षात देखील आहे. 

शाळा व्यवस्थापन समितीचे आंदोलन 

दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षात देखील शाळा इतरत्र भरविण्याचे चित्र आहे. त्यामुळे काल संतप्त शाळा व्यवस्थापन समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तांबेवाडी येथील शाळा जत मधील पंचायत समिती कार्यालयासमोर भरवली आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. आता या आंदोलनानंतर प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका! हेअर केअर रुटीनमध्ये 'या' ७ गोष्टींचा करा समावेश, केस होतील मऊ आणि शाइनी

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

SCROLL FOR NEXT