Sadabhau Khot saam tv
महाराष्ट्र

Sadabhau Khot: ग्लास सुरू अन्‌ क्लास बंद करायचे धोरण राज्य सरकारचेः सदाभाऊ खोत यांची टीका

ग्लास सुरू अन्‌ क्लास बंद करायचे धोरण राज्य सरकारचेः सदाभाऊ खोत यांची टीका

विजय पाटील

सांगली : राज्य सरकार हे दारूवरील कर कमी करायला तत्परता दाखवत आहे. दारूची दुकान सुरू ठेवत ग्लास सुरू ठेवायचा आणि क्लास बंद करायचा; असे धोरण राज्यात या सरकारकडून अवलंबले जात आहे. एका पिडीशी त्याच्या जीवाशी सरकार खेळत आहे. अशी टीका सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे. (sangli news State Government's policy in close class statement of Sadabhau Khot)

कोरोनाच्‍या (Corona) वाढत्‍या प्रादुर्भाला रोखण्यासाठी राज्‍य शासनाने नवीन नियमावली लावली आहे. यात शाळा बंदचा (School Close) निर्णय देखील आहे. यावर निशाणा साधत सांगलीच्या (Sangli) इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत बोलत होते.

एक पिढी शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती

कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्रामध्ये मुलाचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारने खबरदारी आणि नियमावली घालून राज्यातील शाळा कशा चालू राहतील याकडे लक्ष देणे गरजेचे होते. ऑनलाईन पद्धतीने विध्यार्थीमध्ये मोठा खंड पडला आहे. एक पिढी या राज्यांमध्ये शिक्षणापासून वंचित राहते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने मुलाचे लसीकरण करून कोरोनाला कसे रोखता येईल हे पाहून शाळा चालू कराव्यात. एकंदरीत त्याच्या या कारभारात या सरकारला सर्व समाजाला दुभळ करायचे आहे.. असेही खोत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT