Sangli Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Sangli Bribe Case : २५ हजारांची लाच प्रकरणी पोलीस कर्मचारी ताब्यात; सांगली पोलिसात खळबळ

Sangli News : एका बांधकामाच्या ठिकाणी काम करत असलेल्या बाल कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली या प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी बांधकाम ठेकेदाराकडे पोलीस कर्मचारी पाटणकर यांनी ५० हजारांची मागणी केली

विजय पाटील

सांगली : पोलिसात गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच मागितल्या प्रकरणी सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पंधरा दिवसांच्या अंतरात एकाच पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडून लाच मागितल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. यामुळे सांगलीच्या पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

पोलीस नाईक शेखर पाटणकर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यात एका बांधकामाच्या ठिकाणी काम करत असलेल्या बाल कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघात प्रकरणी बाल कामगार असल्याने गुन्हा दाखल न करण्यासाठी संबंधित बांधकाम ठेकेदाराकडे पोलीस कर्मचारी शेखर पाटणकर यांनी ५० हजारांची मागणी केली होती. त्यामध्ये २५ हजारांची लाचेची रक्कम ठरली होती.

ठेकेदाराची एसीबीकडे तक्रार

दरम्यान २५ हजाराची रक्कम देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने याबाबत शहानिशा केली असता पोलीस कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्याची माहिती समोर आली. यामुळे सदरच्या प्रकरणी सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलीस कर्मचारी शेखर पाटणकर याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी महिला पोलिसही ताब्यात 

दरम्यान सांगलीच्या विश्रामबाग या पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याला देखील काही दिवसांपूर्वी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. यानंतर पंधरा दिवसांनंतर आणखी एक पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आल्याचा प्रकार घडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT