Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News : सांगलीतील चोर समजून साधूंना मारहाण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

लहान मुलांचे अपहरण करणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण केल्याची घटना सांगलीत उघडकीस आली.

विजय पाटील

सांगली: लहान मुलांचे अपहरण करणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण केल्याची घटना सांगलीत उघडकीस आली. ही घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा येथील आहे. उत्तर प्रदेशातील चार साधू कर्नाटकातील विजापूरहून पंढरपूर शहरात कारमधून जात होते. यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी आता सहा आरोपींना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. आमसिद्ध सरगर, लहू लोखंडे, नागराज पवार, रमेश कोळी, सचिन बिराजदार, सागर तांबे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हे सर्व साधू सोमवारी जत येथील लवंगा गावातील एका मंदिरात थांबले होते. मंगळवारी सकाळी प्रवासाला सुरूवात करताना त्यांनी एका मुलाला रस्ता विचारला, त्यामुळे तेथील काही गावकऱ्यांना बालचोरांची टोळी असल्याचा संशय आला. यानंतर गावकऱ्यांनी या साधूंची चौकशी सुरू केली, त्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. (Sangli Latest News)

यावेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी साधूंना गाडीतून बाहेर काढले आणि मारहाण केली. त्यांना लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police)तात्काळ घटनास्थळ गाठून याप्रकरणी ६ आरोपींना अटक केली.

पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. पीडितांनी पोलिसांकडे कोणतीही तक्रार केलेली नाही, त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मात्र, राजकीय गदारोळ वाढत असताना सांगली पोलिसांनी स्वत:हून दखल घेत गुन्हा दाखल करून साधूंना मारहाण करणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या लोकांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओच्या आधारे ६ आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT