Suicide Saam tv
महाराष्ट्र

सांगलीत पोलीस हवालदाराची आत्महत्या

सांगलीत पोलीस हवालदाराची आत्महत्या

विजय पाटील

सांगली : सांगलीत एका पोलीस हवालदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरा सदर घटना घडली असून आज सकाळी प्रकार उघडकीस आला आहे. (sangli news police constable commits suicide)

सांगलीतील (Sangli) विश्रामबाग पोलीस लाईनमध्‍ये वास्‍तव्‍यास असलेले रामचंद्र बिरणगे (वय ४६) असे पोलीस हवालदाराचे नाव असून आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. रामचंद्र बिरणगे हे सांगली शहर पोलीस (Police) ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते.

चार दिवसांपुर्वी घरात झाली होती चोरी

चार दिवसांपूर्वी त्यांच्या घरी चोरी झाली असल्याची फिर्याद त्यांच्या पत्नी आरती यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत त्यांनी सुजाता तानाजी हेगडे या संशयित महिलेविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार सुजाता हेगडे या महिले विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर रामचंद्र बिरणगे यांनी गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT