Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : कृष्णा नदीची पातळी खालावली; पाण्यासाठी राष्ट्रवादीकडून आंदोलन

Sangli News : कृष्णा नदीची पातळी खालावली; पाण्यासाठी राष्ट्रवादीकडून आंदोलन

विजय पाटील

सांगली : पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये पाणी सोडण्याची (Sangli News) मागणी केली जात आहे. परंतु पाणी न सोडल्याने पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. यामुळे होत असलेले नुकसान थांबविण्यासाठी त्वरीत पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता आज शरद पवार (NCP) राष्ट्रवादी गटाकडून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. (Tajya Batmya)

राज्यासह सांगली जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस कमी झाला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे योग्य नियोजन करीत पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. वीजनिर्मिती करीता वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्याने वीजनिर्मिती करीता लागणाऱ्या पाण्यामध्ये आवश्यक ती कपात करावी. सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिंचन व पिण्यासाठी पाणी व्यवस्थित उपलब्ध झाल्यास अन्नधान्य उत्पादन व्यवस्थित होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील. परंतु दुर्दैवाने ते झाले नाही. याबाबत जलसंपदा विभागाकडे शेतकऱ्यांनी व विविध शेतीपुरक संस्थांनी अनेकवेळा मागणी करुन देखील कोयना धरणातून पाणी सोडले गेले नाही. यामुळे मागील दहा दिवसांपासून (Krishna River) कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी पूर्णतः खालावली असून जागोजागी नदीपात्र कोरडे पडले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT