Miraj News Saam tv
महाराष्ट्र

Miraj News : शेत जमिनीचा वाद; माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मेव्हण्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

Sangli Miraj News : शेत जमिनीचा वाद मिरज न्यायालयामध्ये सुरू आहे. तरी देखील जबरदस्तीने बाळा उमासे यांनी झोपडी पाडून जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत मारहाण केल्याची तक्रार राहुल ओमासे यांनी पोलीस ठाण्यामध्ये दिली

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे शेत जमिनीचा वाद आहे. या शेत जमिनीवर ताबा घेण्यासाठी मारहाण, दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सदर शेतजमीनीचा निकाल आपल्या बाजूने लागला असल्याने जाणून बुजून आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण ओमासे यांनी दिले आहे.

सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी असलेल्या जमिनीचा वाद सुरु आहे. सदरचे प्रकरण कोर्टात गेले आहे. दरम्यान वादातून झोपडी पाडण्याबरोबर जमिनीचा ताबा घेऊन मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र उर्फ बाळासाहेब उमासे यांच्याकडून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

बेडग या ठिकाणी ६४ गुंठे यांची शेत जमीन आहे. या ठिकाणी सुरेश आणि राहुल उमासे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. सदर शेत जमिनीचा वाद हा मिरज न्यायालयामध्ये सुरू आहे. तरी देखील जबरदस्तीने बाळा उमासे यांनी आपली झोपडी पाडून जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत मारहाण केल्याची तक्रार राहुल ओमासे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. त्यानुसार बाळासो ओमासे यांच्यासह पाच जणांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

ओमसेंकडून आरोपांचे खंडन  

दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले धनंजय मुंडे यांची मेहुणे बाळासो ओमासे यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. सदरच्या शेत जमिनीचा वाद हा मिरज न्यायालयामध्ये सुरू होता. २४ मार्च २०२५ रोजी त्याचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे. सदरची शेतजमीन ही आपल्या पत्नीच्याच नावे आजीकडून बक्षीस पत्राने मिळाली होती. सदर जागेवर आपणच झोपडी मारली होती. ती झोपडी आपण जागा स्वच्छ करण्यासाठी हटवली. कोणत्याही प्रकारची मारहाण केली नाही. केवळ निकाल आपल्या बाजूने लागण्याच्या रागातून हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण हा सर्व प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं बाळासो ओमासे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Income Tax Return: करदात्यांच्या कामाची बातमी! आयकर विभागाने जारी केले नवीन ITR फॉर्म; तुमच्यासाठी कोणता योग्य?

भाजपच्या दिग्गज नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकारणाला हादरा

Maharashtra Live News Update: नामांकित पुमा कंपनीचे बनावट उत्पादन विकणाऱ्या दुकानांवर पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई

पाषाणहृदयी! मोठ्या बहिणीच्या दीरासाठी नवऱ्याची हत्या केली, रात्रभर मृतदेहाशेजारी झोपली

Sugar Side Effects: अचानक साखर खाणं सोडणं पडेल महागात, चेहऱ्यावर दिसतील हे गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT