Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

Sangli News : सांगली जिल्ह्यात वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे वारणा व कृष्णा नदीला पूर आला आहे. यामुळे प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत. इतकेच नाही तर वारणेच्या नदी पात्रातून पाणी बाहेर  पडले असल्याने आजूबाजूच्या परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणीच पाणी साचले आहे. परिणामी शेतातील पिके पाण्याखाली गेले आहेत. 

राज्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस होत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यात वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे वारणा व कृष्णा नदीला पूर आला आहे. यामुळे प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नद्यांना पूर आल्यामुळे आजूबाजूच्या शेतांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. 

जोरदार पडणारा पाऊस आणि कोयनेतुन होणारा विसर्ग त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीपात्रामध्ये पाण्याची वाढ होत आहे. कृष्णा व वारणा नदी पात्रावरील तब्बल १६ बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. अनेक शेतांमध्ये पाणी गेले आहे. तर काही पुलांच्या पायथ्याला पाणी लागले आहे. वारणा नदीवर १० बंधारे, तर कृष्णा नदीवर ७ बंधारे असे तब्बल १७ बंधारे आहेत. त्यापैकी १६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर नदीकाठच्या आसपासच्या शेतामध्ये पाणी गेल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. असाच पाण्याचा विसर्ग राहिला तर आणखी पाणी वाढण्याचा शक्यता वर्तवली जात आहे.

कृष्णेची पातळी २५ फुटावर 

धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पडणारा पाऊस आणि आणि धरणातून केला जाणारा विसर्ग यामुळे सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. वारणा नदी ही पात्रा बाहेर पडले आहे. तर कृष्णेची पातळी ही तब्बल २५ फुटावर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT