Sangli Miraj News Saam tv
महाराष्ट्र

Miraj : मिरजमध्ये १८ लाखाचा गुटखा साठा जप्त; पोलिसांनी केले तस्करीचे रॅकेट उध्वस्त

Sangli Miraj News : महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना मुजावर याला ताब्यात घेऊन केलेल्या तपासणीत त्यांच्याकडे ८२ हजार सहाशे रुपयाचा सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला होता.

विजय पाटील

सांगली : कर्नाटकातून सांगली जिल्ह्यात तस्करी होत असल्याची चर्चा असताना त्यावर कारवाई होत नव्हती. मात्र मिरजच्या महात्मा गांधी पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला कर्नाटकातून जेरबंद केले आहे. नशामुक्त अभियानांतर्गत कारवाई केली असून या कारवाईत सुमारे १८ लाख रुपयांचा गुटखा जप्त करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सांगलीच्या मिरजेमध्ये सुगंधी तंबाखूसह गुटखा पान मसाल्याची विक्री करण्यास राज्यात प्रतिबंध असतानाही कर्नाटकातून माल आणून विक्री केली जात होती. सदर गुटखा विक्रीच्या तयारीत असलेली आंतरराज्य टोळी मिरजच्या महात्मा गांधी पोलीस चौकीने जेरबंद केले आहे. मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना मुजावर याला ताब्यात घेऊन केलेल्या तपासणीत त्यांच्याकडे ८२ हजार सहाशे रुपयाचा सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला होता. 

कर्नाटकातील रॅकेट उध्वस्त 

दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुजावर याने हा माल कर्नाटकातून आणल्याचे व सांगली जिल्ह्यातील पान दुकानदारांना तो चढ्या दराने विकला जाणार होता असे सांगितले. त्यानंतर या टोळीची पाळीमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी पथक तयार करून कर्नाटकात पाठवले. यात विक्री वितरण याची साखळी असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मुख्तार मुजावर, नवीन शेख, कुडचे यांच्याकडून सुगंधी तंबाखू गुटखा व पान मसाला असा तब्बल १७ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जालन्यात विदेशी दारूची वाहतूक करणारा जेरबंद
जालन्यात कारमधून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकाला कदीम पोलिसांनी जेरबंद केल आहे. त्याचा ताब्यातून १ लाख ८ हजारांची विदेशी दारू आणि चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ५८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशोक दारकुंडे असं संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT