Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : संजय राऊत पूर्ण वेडा झालेला माणूस; गोपीचंद पडळकर यांची टीका

Sangli Politics : संजय राऊत यांनी शिवसेनेची राखरांगोळी केली - गोपीचंद पडळकर

विजय पाटील

Sangli Gopichand Padalkar News : खासदार संजय राऊत पूर्ण वेडा झालेला माणूस आहे. त्यांना आता कृपामय रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. तसेच खासदार राऊत यांनी शिवसेनेची राखरांगोळी केली आहे अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. (Latest Marathi News)

शरद पवारांच्या हातात हात घालून शिवसेना संपवून सुद्धा संजय राऊत (Sanjay Raut) गप्पा बसायला तयार नाही. अनेक ठिकाणी वेगवेगळी टीका करत आहेत. त्यांच्या सांगलीच्या दौऱ्यात राष्ट्रवादी कार्यकर्ते यांच्यासोबत होते. त्यामुळे यांची अवस्था म्हणजे म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी झाली आहे अशी टीका देखील गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

हे लोक आता एकमेकांना सांभाळून घेत आहेत. राज्यातलं राहील बाजूला आणि हे लोक आता देशातली भाषा बोलायला लागलेली आहेत,त्यामुळे त्यांना आता कृपामय या ठिकाणी दाखल करण्याची नितांत गरज आहे असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना लगवला आहे. (Maharashtra Political News)

शरद पवार यांच्यासह विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान यांना दिलेल्या पत्रावरून बोलताना पडळकर म्हणाले, शरद पवार नेहमी जे बोलतात त्याच्या उलट करतात, आणि त्यांच्या कृतीतून ते दिसून येईल,असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी लगावाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT