Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: महिला दिनी चूलीवर केला स्वयंपाक; गॅस दरवाढीचा महिला संघटनांकडून निषेध

महिला दिनी चूलीवर केला स्वयंपाक; गॅस दरवाढीचा महिला संघटनांकडून निषेध

विजय पाटील

सांगली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगलीमध्ये विविध महिला संघटनांकडून केंद्र सरकार विरोधात (Sangli News) आंदोलन करण्यात आला आहे. गॅस दर आणि महागाई विरोधात महिलांनी रस्त्यावर चूल पेटवून केंद्र सरकारच्या गॅस (Gas) दरवाढीचा निषेध नोंदवला आहे. (Tajya Batmya)

देशभर आणि जगभरात जागतिक महिला दिन आज साजरा होत आहे. असे असताना सांगली येथे जनवादी महिला संघटना, अखिल भारतीय किसान सभा महिला संघटना आणि अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्यावतीने सांगली शहरातल्या स्टेशन चौक येथे आंदोलन केले. संतप्त महिलांनी केंद्र सरकारच्या गॅस दरवाढी विरोधात आंदोलन केले आहे.

आंदोलनातून महिलांच्‍या व्‍यथा

आंदोलनात महिलांनी चुलीवर भाकऱ्या थापून आणि स्वयंपाक करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला आहे. गॅस दर आणि महागाई वाढल्याने याचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. त्यामुळे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या व्यथा मांडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT