Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त

Sangli News : सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे तर घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर छापा टाकत गांजा जप्तीची कारवाई

विजय पाटील

सांगली : अंमली पदार्थ तसेच गांजा तस्करी व विक्रीस बंदी असताना देखील सर्रासपणे गांजा तस्करी केली जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. अशाच प्रकारे सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे गांजाची लागवड केल्याचे आढळून आले आहे. राहत्या घराच्या बाजूला गांजाची झाडे लागवड केलेल्या ठिकाणी तब्बल ९८ हजार किंमतीचा ९ किलो ८०८ ग्रॅमची गांजाची २३ झाडे जप्त करण्यात आले आहेत. 

गांजाची तस्करी हि वारंवार उघड झाली आहे. तर शेतात पिकांच्या आड लागवड करत गांजा पिकविला जात असतो. असे प्रकार देखील समोर आले आहेत. तर सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे तर घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तेथे छापा टाकत पोलिसांनी गांजा जप्तीची कारवाई केली आहे. 

पोलिसांची घरी जाऊन झडती 

सांगली पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये नागठाणे परिसरामध्ये राजू मदने याने त्याच्या राहत्या घराच्या बाजूला गांजाच्या झाडाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी नागेवाडी येथे जाऊन पाहणी केली असता घराच्या बाजूस लावलेला लहान मोठ्या आकाराचे उग्र वासाची २३ ओलसर गांजाची झाडे आढळून आली. 

तरुणास घेतले ताब्यात 

दरम्यान पोलिसांनी छापेमारी करत घराच्या बाजूला लागवड केलेली गांजाची झाडे जप्त केले आहेत. तर लागवड करणाऱ्या राजू श्रीरंग मदने यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. तसेच अमली पदार्थ, गांजा विक्री साठा लागवड याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावे असे आवाहन ही पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG T20 WC Semi Final: टीम इंडियाचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; आता अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार

मोठी बातमी! भारतीय हवाई दलाचे Su-30 MKI लढाऊ विमान गायब, शोध सुरू

Friday Horoscope : ताणतणाव दूर होईल; ५ राशींच्या लोकांना संकटात आई-वडिलांची साथ मिळेल

Iran–US Conflict:भारतावर तेल संकट! देशात इंधनाचा तुटवडा? क्रूड ऑयलबाबत सरकारनं दिली महत्त्वाची अपडेट

दादांच्या आमदारांनाही घातपाताचा संशय? आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

SCROLL FOR NEXT