Sangli Crime Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime : बनावट ग्राहकाची जन्मतारीख ऐकताच भोंदूबाबा म्हणाला..अघोरी पूजा मांडताच झाला भांडाफोड

Sangli News : भोंदू बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे काही तक्रारी आल्या होत्या. यामुळे अंनिस या भोंदूबाबाच्या तपासात होते. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक डमी बनावट ग्राहक या भोंदूबाबाकडे पाठविला

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रजमध्ये एका भोंदू बाबाचा भांडाफोड करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने करनी आणि अघोरी पूजा करणाऱ्या बाबाकडे एक बनावट ग्राहक पाठवून करणी घालविण्यासाठीची पूजा मांडली. यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी बाबाला रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. 

सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रजमध्ये बाबूजी लखनऊ या नावाने मोहम्मद मतीहउल्ला हा परिचित बाबा होता. अनेक वर्षापासून त्याचा या परिसरात वास्तव्य आहे. या भोंदू बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे काही तक्रारी आल्या होत्या. यामुळे अंनिस या भोंदूबाबाच्या तपासात होते. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक डमी बनावट ग्राहक या भोंदूबाबाकडे पाठविला. 

व्यवसायात तोटा; करणी केलीय.. 

डमी ग्राहक पाठवून या भोंदू बाबाचा अघोरी प्रकार उघडकिस आणला आहे. बनावट ग्राहक या बाबाकडे पाठवला आणि व्यवसायात तोटा होत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर बाबाने त्याची जन्मतारीख विचारली. जन्म तारीख सांगताच कोणीतरी करनी केल्याचे या बाबाकडून सांगण्यात आले. करणीवर उपाय करण्यासाठी नऊ हजार रुपये खर्च येईल आणि शनिवारच्या रात्री दहा वाजता एक अघोरी पूजा करावी लागेल असे सांगितले. 

अघोरी पूजा मांडताच बाबाला पकडला 

त्याप्रमाणे कसबे दिग्रज येथे अघोरी पूजा देखील करण्यात आली. यावेळी काळी बाहुली, लिंबू, पिना, हळद-कुंकू असे बरेच साहित्य मांडून अघोरी पूजा मांडली होती. याबाबत सांगली ग्रामीण पोलीसाना अनिसच्या कार्यकर्ते यांनी ही अघोरी पूजा होणार असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पूजेचे साहित्य आणि बाबाला ताब्यात घेतले. या बाबा विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT