Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli: एकदम ओके, पन्नास हजार रुपये..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजु शेट्टी यांचे झळकले एकत्रित बँनर

एकदम ओके, पन्नास हजार रुपये..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजु शेट्टी यांचे झळकले एकत्रित बँनर

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथील एका शेतकऱ्यांने प्रोत्साहन अनुदान जमा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राजु शेट्टी यांचे एकत्रितपणे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर एकदम ओके, पन्नास हजार रुपये मिळाले; असे जाहीर आभाराचे (Sangali) बँनर झळकाताच तालुक्यात एकच चर्चा सुरु आहे. (Letest Marathi News)

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रेग्युलर कर्ज धारकांना पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहन देण्याचे कबूल केले होते. सरकार जात असताना घाई गडबडीत यांची घोषणा करण्यात आली होती. पण फक्त घोषणा राहीली. राजु शेट्टी यांनी परिक्रमा पंचगंगेची ही यात्रा सप्‍टेंबर २०२० साली प्रयाग चिखली ते नरसिंहवाडी ही दिडशे किलोमीटर अंतराची पायी यात्रा काढून सुध्दा सरकार दखल घेत नव्हते. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारने १५० रूपये प्रती गुठा देऊन पुरग्रस्ताच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यानंतर १३ जुलै २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरवर भर पावसाळ्यात मोर्चा काढण्यात आला होता.

शिंदे सरकारने आश्‍वासन पाळले

मात्र शिंदे सरकारने दखल घेत दिवाळीच्या पुर्वी अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले होते. कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा झाले आहे. यामुळे राजु शेट्टी याच्या लढ्याला यश आले आहे, अशी चर्चा या बॅनरमुळे तालुक्यात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या परदेशातून मुसक्या आवळल्या

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

SCROLL FOR NEXT