Fake Notes Saam tv
महाराष्ट्र

Fake Notes : साडेचार लाखाच्या बनावट नोटा; कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक

Sangli News : साडेचार लाखाच्या बनावट नोटा; कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या विश्रामबाग येथील कल्पद्रुम क्रीडांगणाजवळ तब्बल साडेचार लाखांच्या बनावट नोटा (Sangli News) आढळून आल्या आहेत. या नोटा बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या साऱ्या नोटा बनावट (Fake Notes) असून संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. (Latest Marathi News)

सांगलीच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी तिघेजण संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांनी (Police) त्या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडील बॅगमध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल सापडले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्या पाचशेच्या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तब्बल ४ लाख ३८ हजार पाचशे रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे दिसून आले. 

तिघे ताब्यात 

बनावट नोटा आढळून आलेल्या वाहिद रफिक पठाण, जमीर बागवान, संतोष हाताळे असे संशयितांची नावे आहेत. या साऱ्या नोटा ५०० च्या असून त्या कुठून आणल्या कुठे तयार केल्या याची माहिती पोलीस घेत आहेत. बनावट नोटांचे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यादृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT