Corona Update News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: कोरोना रुग्णांसाठी ५० खाट आरक्षित; ऑक्सिजन प्लांटही केला कार्यान्वित

कोरोना रुग्णांसाठी ५० खाट आरक्षित; ऑक्सिजन प्लांटही केला कार्यान्वित

विजय पाटील

सांगली : चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या धोका नसला तरी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये कालपासून कोरोना (Corona News) रुग्णांसाठी 50 खाट आरक्षित करण्यात आल्‍याची माहिती डॉ. रुपेश शिंदे यांनी दिली. (Letest Marathi News)

यापूर्वीच्या कोरोना लाटेमध्ये मिरजेतील (Miraj) शासकीय रुग्णालयात स्वतंत्र असे कोरोना रुग्णालय स्थापन करण्यात आले होते. हजारो रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले. (Coronavirus) कोरोना गेल्यानंतर इतर रुग्णांसाठी हे रुग्णालय (Hospital) खुले करण्यात आले होते. आता चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात नसली तरी दीर्घ काळाने कोरोना पुन्हा भारतात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शासनाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने मिरज शासकीय रुग्णालयात पुन्हा कोरोना विभाग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 50 खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

ऑक्सिजन प्लांटही कार्यान्‍वीत

ऑक्सिजन प्लांट येथे पूर्वीच उभारण्यात आला होता. त्याचे विजेचे बिल रुग्णालयाला परवडत नसल्याने ते बंद होते. ते आता पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे. या ऑक्सिजन प्लांटसाठी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णासाठी लागणार्‍या इतर साहित्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT