Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli: भिंत फोडून बँकेत दरोड्याचा प्रयत्न

भिंत फोडून बँकेत दरोड्याचा प्रयत्न

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा फोडण्याचा (Robbery) प्रयत्न अज्ञात चोरट्याचा फसला आहे. हा प्रकार १५ ते १७ ऑक्‍टोंबरच्या दरम्यान घडला आहे. अज्ञात चोरट्या विरोधात कवठेमहांकाळ पोलिसात (Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Letest Marathi News)

शिरढोण येतील (Bank) बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ही रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग लगत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील पश्चिम भागामधील बँक ऑफ महाराष्ट्र एकच शाखा असल्याने या ठिकाणी (Sangli) मोठे व्यवहार चालतात. दरम्यान शनिवारी (१५ ऑक्‍टोंबर) बँकेतील कर्मचारी यांनी बँकेला कुलूप लावून दुपारी गेले होते. बँकेच्या इमारतीला लागून पुर्वेला शेत आहे. अज्ञात चोरट्याने पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या भिंतीला हातोड्याने लोखंडी सळीने भगदाड पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु अज्ञात चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आणि लोखंडी हातोडा भिंती जवळ टाकून अज्ञात चोरटे पळून गेले.

दुसऱ्यांदा झाला प्रयत्‍न

बँकेचे शाखा अधिकारी सागर जाधव आणि कर्मचारी सोमवारी सकाळी बँकेत आल्यावर त्यांना भिंतीला भगदाड पडल्याचे दिसले. यावेळी बँक फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केला असल्याचे लक्षात आले. तर बँक दुसऱ्यांदा फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केला. याआधी पाच महिन्यापूर्वी याच बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्याने काढून पलायन केले होते. त्यामुळे याच बँकेवर सातत्याने चोरीचा प्रकार घडत आहे. याची फिर्याद शाखाधिकारी सागर वसंत जाधव यांनी कवठेमहांकाळ पोलिसात दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Work Life Balance : नोकरी अन् घर सांभाळताना दमछाक होतेय? वर्किंग मदर्सनी वापरा 'ही' सोपी ट्रिक; ताण होईल गायब

Maharashtra News Live Update: बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधारास मालेगाव संगमेश्वर येथे बेड्या

राज्यात सूर्य आग ओकणार; कुठे किती तापमान? वरुणराजा कुठे बरसणार?

kidney disease - सावधान! 'हे' दोन सामान्य आजार गपचूप खराब करत आहेत तुमची किडनी; सुरुवातीला दिसतच नाहीत लक्षणे

Sunday Horoscope: मेषसह या 3 राशींसाठी आजचा दिवस खास; कामात यश, मिळणार आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT