Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli : इस्लामपूरमध्ये २८ किलो गांजा जप्त; तिघांना ताब्यात घेत साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Sangli News : अंमली पदार्थ वाहतूक व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. प्रामुख्याने गांजा तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे

विजय पाटील

सांगली : अमली पदार्थ विरोधात पालकमंत्री यांनी स्थापन केलेला टास्क फोर्सने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यानुसार सांगलीच्या इस्लामपूर जवळील ओझर्डे ते घटकवाडी रस्त्यावरील कुंभार वस्ती परिसरात तब्बल आठ लाख ४० हजार रुपयांचा २७ किलो ९२५ ग्रॅम गांजा पथकाने जप्त करण्यात आला आहे. एलसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. 

अंमली पदार्थ वाहतूक व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील सर्रासपणे विक्रीच्या अनुषंगाने वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. प्रामुख्याने गांजा तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे. अशाच प्रकारे सांगलीच्या इस्लामपूर येथील एलसीबीच्या पथकाने कारवाई करत गांजाची होत असलेली तस्करी रोखत मुद्देमाल जप्त केला आहे. 

सापळा रचत घेतले ताब्यात 

दरम्यान संशयित सुनील कुंभार हा सुजय खोत आणि परशुराम कोळी यांच्याकडून तयार गांजा घेण्यासाठी कुंभार वस्ती येथे येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळाने तिघेजण कुंभार वस्ती येथे एका शेतात असणाऱ्या उसाच्या वाड्याच्या गंजी जवळ थांबले होते. त्यातील एकाने गंजी खाली लपवलेल्या पांढऱ्या रंगाची गोणी काढली. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.  

इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल 

पोलिसांनी त्यांच्याकडून तयार केलेला गांजा खरेदीसाठी आणण्याची कबुली दिली. त्यामुळे संशयित दोघांकडे केलेल्या चौकशीत नामदेव तेलंग (हैदराबाद) यांच्याकडून गांजा आणल्याचे सांगितले. पोलिसांनी संशयताकडून साधारण २७ किलो ९२५ ग्रॅम इतक्या वजनाचा गांजा हस्तगत केला आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

SCROLL FOR NEXT