सांगली, मिरजेतील व्यापाऱ्यांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा.. विजय पाटील
महाराष्ट्र

सांगली, मिरजेतील व्यापाऱ्यांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा...

लॉकडाऊन वाढल्याने व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा आज बांध फुटला व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक, तहसीलदार कार्यालय बॉण्ड विक्रेते यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

विजय पाटील

सांगली - मिरज महापालिका corporation क्षेत्रात कोरोना corona चौथ्या टप्प्यात गेल्याने शासनाने government लॉकडाऊन मध्ये वाढ केली आहे. अत्यावश्यक emergency सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा आदेश दिले आहेत. गेले दोन महिने पेक्षा जास्त दिवस झाले अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यापारी छोटे मोठे व्यवसाय बंद आहेत. Sangli, Miraj Traders march on the provincial office

आता परत लॉकडाऊन वाढल्याने व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा आज बांध फुटला. व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक, तहसीलदार Tehsildar कार्यालय बॉण्ड विक्रेते यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता.. प्रांत कार्यालयासमोर दुकाने उघडण्याच्या परवानगी द्यावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये मिरज व्यापारी असो, सराफी संघटना, कापड व्यापारी, कटलरी दुकानदार, बॉण्ड विक्रेते यांच्यासह छोटे-मोठे दुकानदार सहभागी झाले होते.

यावेळी "आम्ही उपाशी मरणार नाही आता आम्ही दुकाने उघडणार" अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली होती. यावेळी प्रांत अधिकारी यांनी दुकाने उघण्याची परवानगी द्यावी अन्यथा आम्ही स्वतः दुकाने सुरू करतो असा इशारा असोसिएशनचे विराज कोकणे यांनी  दिला.

तर व्यापाऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचण्यात येतील तो पर्यंत दुकाने बंद ठेवा असे  प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी आंदोलकांना सांगितले.. पण आंदोलन संपल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली होती.

कोरोना हा फक्त व्यापाऱ्यांच्या मुळे पसरतो का? असा सवाल व्यापाऱ्यांनी केला आहे. शासनाने कर माफ करावे आम्ही दुकाने बंद ठेवतो अशी भूमिका घेऊन आपले ड्रेस मटेरियल दुकान आज उघडले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT