sangli bomb squad visited miraj saam tv
महाराष्ट्र

Miraj: बेवारस बॅगमुळं नागरिकांची उडाली झाेप; बॉम्ब शाेध पथकामुळं मिळाला दिलासा

तपासणीत बॅगेत आक्षेपार्ह बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली नसल्याने सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.

विजय पाटील

सांगली : सांगली मिरज नरवाडे पेट्रोल पंपासमोर रस्त्याकडेला एक लाल रंगाची प्रवासी बँग आणि एक पोते बेवारस स्थितीत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याची माहिती मिरज (miraj) शहर पोलिसांना दिल्यानंतर सांगली जिल्हा बॉम्ब शोध पथकास पाचारण करण्यात आले होते. (sangli district bomb squad visited miraj for investigation)

या परिसरात बाॅंम्ब पथक दाखल झाल्याची माहिती समजताच नागरिकांची गर्दी झाली हाेती. यावेळी स्निपर डॉग लिओ आणि अँटी संबोटेज तपासणी केली. तपासणीत बॅगेत आक्षेपार्ह बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली नसल्याने सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान बॅगेत कपडे हाेते. बेळगाव (belgaum) येथील अज्ञात व्यक्ती मिरजेत आली होती. संबंधित व्यक्ती बॅग विसरून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित बॅग आणि पोते पोलिसांनी (police) ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात जमा केली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

SCROLL FOR NEXT