Sangli: सहा जात पंचाविरोधात पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  विजय पाटील
महाराष्ट्र

Sangli: सहा जात पंचाविरोधात पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जवळपास १५० जोडप्यांना वाळीत टाकणाऱ्या जात पंचाविरोधात कारवाई

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली: आंतरजातीय विवाह केल्यामुळे १५० दाम्पत्यांना बहिष्कृत केल्याप्रकरणी नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचाविरुद्ध सांगलीच्या (Sangli) पलूस (Palus) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यानी आग्रही होऊन समाजातून बहिष्कृत करणाऱ्यांवर कारवाई (Action) करण्यासासाठी प्रयत्न केले आहेत.

इस्लामपूर (Islampur) येथील प्रकाश भोसले यांनी या प्रकरणी पलूस पोलीस (Police)ठाण्यात समाजातील पंचाविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी नंदीवाले समाजाचे पंच विलास भिंगार्डे, चंद्रकांत पवार राहणार इस्लामपूर, शामराव देशमुख, अशोक भोसले रा. दुधोंडी, किसन इंगवले रा.जुळेवाडी आणि विलास मोकाशी रा. निमणी या सहा पंचाविरोधात पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

राज्यातील (state) नंदीवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा सुमारे १५० दाम्पत्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. बहिष्कृत केलेल्यांना समाजातील सुख- दु:खाच्या प्रसंगी बोलावले जात नाही. त्यांच्याशी संबंध ठेवले जात नाहीत. अशा तीस दाम्पत्यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) सातारा (Satara) शाखेशी संपर्क साधून बहिष्कार उठविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.

अंनिसने काही पंचांशी संपर्क साधून हा प्रकार बेकायदा असल्याचे सांगितले आहे. त्यावेळी त्यांनी बहिष्कार मागे घेत असल्याचेही देखील कबूल केले आहे. मात्र, पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे ९ जानेवारी रोजी झालेल्या जात पंचायतीच्या बैठकीत बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्याने गुन्हा दाखल करावा लागल्याचे पीडित प्रकाश भोसले यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Maharashtra News Live Update: महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल - मंत्री संजय शिरसाट

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi Serial: 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT