सांगलीतील शेतकरी आक्रमक. 
महाराष्ट्र

सांगलीत शेतकरी कलेक्टर कचेरीवर धडकले चड्डी-बनियानवर

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली ः ऊसबिल अदा करण्याबाबत सरकारने नियमावली केली आहे. एफआरपीप्रमाणे पैसे न दिल्यास त्या साखर कारखान्यावर कारवाई केली जाते. असे असतानाही सांगलीतील साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. अनेकदा आंदोलने करूनही बिल अदा केले जात नाही.Sangli Farmers Association agitation for payment of sugarcane

सांगलीच्या तासगाव आणि नागेवाडी या 2 साखर कारखान्याचे चेअरमन खासदार संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली उसबिलासाठी विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे. मात्र, उसबिल अद्याप मिळाले नाही. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी चड्डी-बनियान मोर्चा मोर्चाने जाऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी संदीप राजोबा आणि शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.  Sangli Farmers Association agitation for payment of sugarcane

शेतकरी काबाड कष्ट करून ऊस पिकवतो. आणि हे साखरसम्राट शेतकऱ्यांचे बिल देण्यात कुचराई करीत आहेत. खासदार संजय काका पाटील यांना सदबुद्धी यावी आणि या शेतकऱ्यांचं थकीत बिल द्यावे अन्यथा नग्न अवस्थेमध्ये आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT