Sangli Crime News Wife killed husband in miraj taluka erandoli village Saam TV
महाराष्ट्र

Sangli Crime News: भयंकर! नवऱ्याचा खून करून बायको फरार; पोलीस तपासांत धक्कादायक कारण उघड

Sangli Crime Wife killed Husband: घरगुती वादातून आपल्या पतीवर धारधार शस्त्राने वार करत खून केला. त्यानंतर पत्नी घटनास्थळावरून पसार झाली.

विजय पाटील

Sangli Crime Wife killed Husband: पती-पत्नीचा वाद ही काही बाब नवीन नाही. संसाराचा गाडा हाकताना पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात, तर काहीवेळा ते विकोपाला देखील जातात. यातून पुढे गुन्हेगारीच्या घटना घडतात. अशीतच एक घटना सांगली जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे एका पत्नीने चक्क आपल्याच पतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. (Breaking Marathi News)

घरगुती वादातून आपल्या पतीवर धारधार शस्त्राने वार करत खून केला. त्यानंतर पत्नी घटनास्थळावरून पसार झाली. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या एरंडोली येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेणे सुरू आहे. (Latest Marathi News)

पत्नीने केली पतीची हत्या, नेमकं काय घडलं?

सांगलीच्या (Sangali Crime) मिरज तालुक्यातल्या एरंडोली या ठिकाणी पारधी वस्तीवरील कुटुंबातल्या पती-पत्नीमध्ये घरगुती वादातून भांडण झाले. वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून पत्नीने थेट पतीचा खून केल्याची घटना घडली. सुभेदार आनंदराव काळे (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर चांदणी काळे असे पत्नीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनसार, दुपारच्या सुमारास जेवण (Crime News) बनवताना दोघा पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. यातून सुभेदार काळे पत्नी चांदणी हिच्या अंगावर धावून गेला. यावेळी पत्नीने धारदार शस्त्राने पती सुभेदार काळे याच्या अंगावर आणि छातीवर वार केले. यामध्ये पती सुभेदार काळे याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पारधी वस्तीवर एकच खळबळ उडाली. दरम्यान मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तर या घटनेनंतर पत्नी चांदणी काळे ही पसार झाली आहे. पोलीस फरार झालेल्या महिलेचा शोध घेत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT