Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : तासगाव अर्बन बँकेत दरोड्याचा प्रयत्न फसला; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Sangli News : हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्यावेळी सहसा बाहेर फारशी रहदारी पाहण्यास मिळत नाही. याचा फायदा घेत चोरटे हार साफ करत असतात.

विजय पाटील

सांगली : सांगलीमधील तासगाव अर्बन बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. पहाटेच्या सुमारास दोघा अज्ञात चोरट्यांनी बँकेत शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरांच्या हाताला काहीच लागले नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने चोरांना परतावे लागले आहे.

हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्यावेळी सहसा बाहेर फारशी रहदारी पाहण्यास मिळत नाही. याचा फायदा घेत चोरटे हार साफ करत असतात. दरम्यान चोरीच्या घटना मागील काही दिवसात वाढल्याचे दिसून येते. त्यानुसार (Sangli News) सांगली शहरातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये असणाऱ्या तासगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत रात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला. बँकेचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता. 

दरम्यान चोरटे बँकेत शिरल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली. मात्र त्यांच्या हाती काहीच न सापडल्याने रिकाम्या हाती गेले. हा सर्व प्रकार बँकेतल्या (CCTV) सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. यावेळी चोरट्यांकडून सीसीटीव्ही बंद करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. दरम्यान चोरीच्या घटनेच्या नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT