crime news saam tv
महाराष्ट्र

Sangli: सांगलीच्या वाहतुक पाेलिसांनी पकडला पाच लाखांचा गुटखा; एक अटकेत

जीपची तपासणी करताना त्यामध्ये पाेलिसांना तंबाखू, गुटखा दिसून आला.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) शहरात एका वाहनावर पोलिसांनी छापा टाकून साडेपाच लाखांचा गुटखा (gutkha) जप्त केला आहे. ही कारवाई वाहतूक नियंत्रक पोलिसांनी (police) केली. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात पोलिस सुशांत गुलाबराव पाटील यांनी तक्रार दिली आहे. (sangli crime news)

पोलिसांनी याप्रकरणी आलताफ इस्माईल शेख या संशयितास अटक (arrest) केली आहे. त्याच्याकडून जीपसह सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी रात्री उशिरा कुपवाड फाटा येथे सुशांत पाटील हे वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी जीपची तपासणी करताना त्यामध्ये तंबाखू, गुटखा दिसून आला.

यामध्ये चार लाख ४१ हजार रुपये किंमतीचा हिरा पान मसाला ३५ पोत्यांत मिळून आला. त्याशिवाय एक लाख १० हजार २५० रुपयांची रॉयल तंबाखू ३५ पोत्यांत मिळून आली. शेख हा कर्नाटकातून हा गुटखा घेऊन येत होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT