Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime : सिनेस्टाईल पाठलाग करत चोरट्यांना पकडले; बेदम चोप देत केले पोलिसांच्या स्वाधीन

Sangli News : सांगली जिल्ह्यातील आमणापूर गावामध्ये चोरांची टोळी आल्याचा संशय काही तरुणांना आला. यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत चोरट्यांच्या टोळीचा पाठलाग सुरू केला.

विजय पाटील

सांगली : चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा गावकऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पकडले. गावकऱ्यांनी दोघांना पकडून सुरवातीला दम चोप दिला. यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातील अमनापूर येथे हा प्रकार घडला आहे.

सांगली (Sangli) जिल्ह्यातील आमणापूर गावामध्ये चोरांची टोळी आल्याचा संशय काही तरुणांना आला. यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत चोरट्यांच्या टोळीचा पाठलाग सुरू केला. दरम्यान गावकरी पाठलाग करत असल्याचे पाहून चोरटे मिळेल त्या रस्त्याने पळू लागले होते. यात काही (Crime News) चोरट्यांनी दुचाकीवरून पलायन केलं. तर यापैकी तिघा चोरट्यांनी बचाव करण्यासाठी कृष्णा नदी पात्रामध्ये उड्या घेतल्या. त्यातील दोघा जणांना काठावर गाठून गावकऱ्यांनी ताब्यात घेत बेदम चोप देत भिलवडी पोलिसांच्या स्वाधीन केलं. 

तर पलायन करणाऱ्या दोघांकडून चोरीसाठी लागणारे साहित्याची बॅग देखील जप्त करण्यात आली आहे. सुमारे दोन ते तीन तास गावांमध्ये चोरांना पकडण्यासाठीचा सिनेस्टाईल थरार सुरू होता. गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर भिलवडी (Police) पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघा चोरट्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतील आश्चर्यकारक ५ बदल

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT