Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: लोकशाही दिनी घडला धक्‍कादायक प्रकार; आयुक्तांवर भिरकावला बूट

लोकशाही दिनी घडला धक्‍कादायक प्रकार; आयुक्तांवर भिरकावला बूट

विजय पाटील

सांगली : सांगली महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्यावर एका व्यक्तीकडून बूट फेकून शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या कैलास काळे नामक व्यक्तीला ताब्‍यात घेतला आहे. तर आयुक्‍तांवर झालेल्या या हल्ल्याच्या घटनेनंतर महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत (Sangli News) सांगली महापालिकेसमोर निदर्शने केली आहेत. (Latest Marathi News)

लोकशाही दिनानिमित्त सांगली महापालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये विविध तक्रारी ऐकून घेण्याचा कार्यक्रम सुरू होता. आयुक्त, उपायुक्त यांच्या उपस्थितीत सुनावणी सुरू होती. यावेळी कैलास काळे यांनी गुंठेवारी प्रमाणपत्र बाबतीत असणाऱ्या त्याची तक्रार आयुक्त पवार यांच्यासमोर सादर केली. पण कायदेशीर दृष्ट्या आयुक्तांनी सदरची तक्रार मान्य करण्यात येत नसल्याचे सांगितले. याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करण्यास सांगितले. यानंतर कैलास काळे यांनी रागाच्या भरात आयुक्त सुनील पवार यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर पायातला बूट फेकून मारला. या घटनेनंतर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कैलास काळे याला ताब्यात घेत सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. तर काळे यांची तक्रार आणि मागणी आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे स्पष्ट केले होते; असे आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचे कामबंद

दरम्यान आयुक्त पवार यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर सांगली महापालिका क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत सांगली महापालिका कार्यालयासमोर एकत्र येत आंदोलन सुरू केला आहे. संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी अन्यथा काम बंद सुरूच राहिल असा इशारा दिला आहे. या सर्व प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने नागरिकांचे होणारी गैरसोयी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त पवार यांनी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेवून नागरिकांची गैरसोयी टाळावी असे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT