Maharashtra Assembly Election 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Sangli Politics: ठाकरेंच्या पैलवानाने शड्डू ठोकला! 'विधानसभेत गद्दारी कराल तर किंमत मोजावी लागेल', चंद्रहार पाटलांचा 'मविआ'ला इशारा

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत तापलेले सांगलीचे राजकारण विधानसभेतही चांगलेच गाजणार असल्याचे दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला थेट इशारा दिला आहे. नेमकं काय म्हणाले, चंद्रहार पाटील? वाचा...

विजय पाटील

सांगली, ता. १६ जून २०२४

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आलेले सांगली जिल्ह्याचे राजकारण आता विधानसभेलाही गाजणार असल्याचे दिसत आहे. एकीकडे विधानसभेच्या जागा वाटपावरुन काँग्रेस- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. अशातच काँग्रेस- राष्ट्रवादीच्या वादात शिवसेना ठाकरे गटानेही उडी घेतली असून डबल महाराष्ट्र केसरी उमेदवार चंद्रहार पाटील यांनी थेट इशारा दिला आहे.

काय म्हणाले चंद्रहार पाटील?

"येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यामध्ये या पूर्वीच्या शिवसेनेच्या दोन जागा कोणत्याही परिस्थितीत ठाकरे गट लढवणार आहे. खानापूर -आटपाडी आणि मिरज या दोन विधानसभा जागा शिवसेना पक्ष लढवणार आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले.

तसेच "आमच्या हक्काच्या जागा सोडणार नाही, त्या कोणत्याही लढवणार आहोत. लोकसभेच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीमध्ये राहून जी गद्दारी केली शिवसेनेसोबत केली, ती विधानसभेत केली तर येणाऱ्या काळात मोठी किंमत काँग्रेस- राष्ट्रवादीला मोजावी लागेल, '" असा थेट इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला.

"लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी प्रामणिकपणे काम करुन महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न केले. आज काँग्रेसचा एक खासदार असताना १० खासदारांवर संख्या गेली. राष्ट्रवादीचे ४ खासदारांचे ८ खासदार झाले. हे सर्व श्रेय उद्धव साहेबांना जाते," असेही चंद्रहार पाटील यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT