Sangli News  Saam TV
महाराष्ट्र

Sangli News : सांगलीत स्पीड ब्रेकरने घेतला जीव, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

Sangli Accident News : सांगलीतील बिरनाळे कॉलेज परिसरातही घटना घडली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

Sangli Accident News :

सांगलीतून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. स्पीड ब्रेकरमुळे एका व्यक्तीचा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. सांगलीतील बिरनाळे कॉलेज परिसरातही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

सांगलीत स्पीड ब्रेकरवरुन जात असताना दुचाकीचा अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झालाय. विजय मगदूम असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सांगलीतील बिरनाळे कॉलेजसमोर असलेल्या स्पीड ब्रेकरवर रात्री 11 वाजता अपघात झाला आहे. (Latest Marathi News)

बिरणाळे कॉलेजसमोरील स्पीड ब्रेकरवर मगदूम यांची गाडी घरसली आणि ते गाडीसह रस्त्यावर पडले. यात त्याच्या डोक्याला मार लागला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्रावदेखील झाला. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

अपघातानंतर स्थानिक तरुण मदतीसाठी तातडीने धावले. त्यांनी मगदूम यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विजय मगदूम हे सांगलीतील एकता मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत.

या घटनेनंतर मगदूम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातही विजय मगदूम यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT