सचिन कदम
पेण : तालुक्यातील रामवाडीत दुर्देवी घटना घडली आहे. इमारतीच्या लिफ्टमधून खाली पडल्याने (woman death) एका महिलेचा मृत्यू झाला आहे. संगीता केलसकर असं मृत महिलेचं नाव आहे. महिला लिफ्टने खाली येत असताना लिफ्ट पाचव्या मजल्यावर अचानक बंद पडली. त्यानंतर त्या महिलेने (lift alarm) लिफ्टमधील अलार्म वाजवला. त्यानंतर सुरक्षारक्षकाने लिफ्टचा दरवाजा उघडून महिलेला खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला खाली उतरत असताना तिचा तोल गेला आणि ती महिला इमारतीच्या खाली पडली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात (Pen Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेणमधील रामवाडीत इमारतीच्या लिफ्टमधून खाली पडल्याने एका महिलेचा दु्र्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लिफ्टमध्ये जात असताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सोसायटीच्या माध्यमातून केले जाते. पण काही तांत्रिक अडचणींमुळे लिफ्ट बंद होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे काही नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पेणमध्येही अशाच प्रकारची घटना घडल्याने सोसयटीतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.