Cyber Crime News Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime News: कस्टम ऑफिसरने पकडल्याचे सांगत फसवणूक; व्हाट्सअपवरून झाली ओळख

Sangvi News: कस्टम ऑफिसरने पकडल्याचे सांगत फसवणूक; व्हाट्सअपवरून झाली ओळख

गोपाल मोटघरे

पिंपरी- चिंचवड : अमेरिकेतून भारतात येत असून दिल्ली येथे कस्टम ऑफिसरने पकडल्याचे सांगून एकाची दोन लाख रुपयांत (Fraud) फसवणूक करण्यात आली. सदर घटना १७ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या कालावधीत सांगवी परिसरात घडली आहे. या प्रकरणी (Police) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी यांची व्हाट्सअपवरून ओळख झाली. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत मैत्री केली. त्यानंतर आपण अमेरिकेतून भारतात येत असल्याचे सांगितले. तसेच आपल्याला (Cyber Crime) दिल्लीतील कस्टम ऑफिस येथे पकडले असल्याचे देखील सांगितले. त्यानंतर कस्टमपासून सुटका करण्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून वेळोवेळी दोन लाख ३ हजार ५०० रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक केली आहे. 

महिलेसह एकावर गुन्हा दाखल  

सदर फसवणुकीच्या घटनेत जितेशकुमार वशिष्ठ बरनवाल यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून डॉ. केलीमिचेल आणि एक अनोळखी महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ; मुख्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT