youth, arrests, sangamner, love jihad, bihar Saam Tv
महाराष्ट्र

Sangamner Crime News : मुलीला पळवून नेण्याचा आखला डाव, बिहारच्या दाेघांना अटक

पाेलिस या गुन्ह्याचा कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Sangamner News : सोशल मिडियातून (social media) मुलीशी ओळख झालेल्या दाेघा युवकांनी तिला पळवून नेण्याचा डाव रचल्याची तक्रार मुलीने पाेलिसांत दिली. त्यानंतर संगमनेर पाेलिसांनी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली. हे दाेन्ही युवक बिहार मधील असल्याचे पाेलिसांनी सांगितले. (Maharashtra News)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी - 2 वर्षांपूर्वी पब्जी गेमच्या माध्यमातून मुलीची दाेन युवकांशी ओळख झाली. त्यानंतर संबंधित मुलीला युवक भेटायला आले. या युवकांनी मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद तिने पाेलिसांत दाखल केली.

मुलीच्या फिर्यादीनंतर बिहार राज्यातील अकरम शेख व नेमतुल्ला या दाेघांना पाेलिसांनी अटक केली. दरम्यान हा प्रकार लव्ह जिहाद व धर्मातरचा असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला. पोलिस तपासात धर्मांतर की लव्ह जिहाद हे स्पष्ट हाेईलच असेही हिंदुत्तवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले.

दरम्यान आज (शनिवार) दुपारी संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती संगमनेर पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT