सचिन बनसोडे, साम टीव्ही संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली. संगमनेर शहरात राहणाऱ्या पती-पत्नी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. गणेश मच्छिंद्र वाडेकर आणि गौरी गणेश वाडेकर, असं मृत दाम्पत्याचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या मुलाने देखील 5 दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. तिघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
मात्र, एकाच कुटुंबातील तिघांनी टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश आणि गौरी वाडेकर हे संगमनेर शहरात (Sangamner News) राहतात. त्यांचा 21 वर्षीय मुलगा श्रीधर वाडेकर हा पुण्यात शिक्षण घेत होता. 5 दिवसांपूर्वी श्रीधर याने पुण्यात आत्महत्या केल्याने वाडेकर दाम्पत्य प्रचंड नैराश्येत गेले होते.
मंगळवारी गणेश आणि गौरी वाडेकर या पती-पत्नीने संगमनेर शहरातील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
गणेश वाडेकर हे संगमनेर नगरपालिकेतील सेवेनंतर सेवानिवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी गौरी वाडेकर या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. अगदी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाने देखील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
तर लहान मुलाने 5 दिवसांपूर्वी पुण्यात आत्महत्या केली. दोन वर्षात संपूर्ण वाडेकर कुटुंबाने आत्महत्या करत आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.