Sangali News Saamtv
महाराष्ट्र

Sangali News: काय सांगता! 'पोराला’ देवून चक्क “पोरीला” घेतले दत्तक; अनोख्या प्रकरणाची जिल्ह्यात रंगली चर्चा

सुखदेव माने यांच्या कुटुंबातील दोघा सख्ख्या भावंडांनी हा कौतुकास्पद निर्णय घेत जगासमोर एक नवा ‘आदर्श’ ठेवला आहे...

विजय पाटील साम टीव्ही सांगली

Sangali News: मुलगी झाली म्हणून तिला रस्त्यावर सोडायचं, मुलीचा पोटातच गर्भपात करायचा, वंशाला दिवा पाहिजे अशीच इच्छा ठेवायची अशा बातम्या नेहमीच ऐकायला मिळत असतात. मात्र सांगलीमधील जत तालुक्यातील शेगावमध्ये चक्क आपल्या लहान मुलाला दत्तक देऊन मुलगी दत्तक घेण्याचा प्रकार घडला आहे.

शेगावमधील सुखदेव माने यांच्या कुटुंबातील दोघा सख्ख्या भावंडांनी हा कौतुकास्पद निर्णय घेत जगासमोर एक नवा ‘आदर्श’ ठेवला आहे. (Sangali News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मुलीसाठी चक्क मुलगा दत्तक देण्याचा अनोखा प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातल्या शेगावमध्ये घडला आहे. यामध्ये मोठया भावाने आपल्या लहान भावाच्या मुलीला दत्तक घेत, त्याला आपला लहान मुलगा दत्तक दिला आणि मुलीचा नामकरण सोहळा अगदी दिमाखात साजरा केला. आता या अनोख्या दत्तक प्रकरणाची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे.

बिरुदेव सुखदेव माने आणि त्यांचा लहानं भाऊ आप्पासो सुखदेव माने हे आपल्या आई – वडीलांसमवेत एकत्र कुटुंबातच राहतात.बिरुदेव माने यांना एक मुलगा होता तर सुखदेव माने यांना एक मुलगी. दोन्ही भावांना काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा दोन मुलं झाली ज्यामध्ये मोठी भाऊ बिरूदेव माने याला पुन्हा मुलगा तर लहान भाऊ अप्पासो माने याला पुन्हा दुसरी मुलगी झाली. आप्पासो माने यांना मुलगा हवा होता,तर बिरुदेव माने यांना मुलगी हवी होती.

या दोघा भावांनी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी घरच्यांची विचार विनिमय करून आपल्या मुलांना एकमेकांना दत्तक देण्याचा निर्णय घेतला. मोठ्या भावाला लहान भावाने आपली मुलगी द्यायची आणि त्या बदल्यात मोठ्या भावाने लहान भावाला मुलगा दत्तक द्यायचं ठरलं आणि यासाठी मग या दोघा भावंडांनी नामकरण सोहळा देखील आयोजित केला.

त्यांनी संपूर्ण गावाला या सोहळ्यासाठी निमंत्रणही धाडलं. या सोहळ्यामध्ये लहान भावाने आपली 2 महिन्याची मुलगी अन्विता हि मोठ्या भावाला तर मोठ्या भावाने आपला 2 वर्षाचा मुलगा आरुष हा लहान भावाला दत्तक दिला.

दरम्यान दत्तक पुत्र आणि दत्तकपुत्रीच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रियादेखील दोघा भावांनी पूर्ण केली आहे. शेगावच्या माने कुटुंबियांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT