Sangli News: पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो नाकारल्याने सांगलीच्या आटपाडी येथील एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आगारप्रमुखाच्या दालनासमोर झोपून आंदोलन सुरू केले. या अनोख्या आंदोलनाची चर्चा आटपाडी परिसरात रंगली होती. दरम्यान एस टीच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेत आणि आज त्याच्या पतीला उपचारासाठी एक दिवसाची रजा दिली आहे. (Latest Marathi News Update)
याबाबत अधिक माहिती अशी की, विलास कदम हे 33 वर्षांपासून एसटीत चालक म्हणून सेवेत आहेत. 70 दिवसांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची 270 दिवस रजा शिल्लक आहे. त्यांनी आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 आणि 13 मार्च अशा दोन दिवसांच्या रजेसाठी त्यांनी आगारप्रमुखांकडे 6 मार्च रोजी अर्ज केला होता. मात्र, सुटी नाकारल्याने पत्नी नलिनी यांनी आगारप्रमुखांच्या केबिनबाहेर अंथरुण टाकून आंदोलन सुरू केले होते. या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा रंगली होती.
दरम्यान, त्यांच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनाला अखेर यश आले असून एस टीच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेतली. तसेच आज त्याच्या पतीला उपचारासाठी एक दिवसाची रजाही दिली आहे. पण (Sangali)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.