Sangali News  Saam TV
महाराष्ट्र

Sangali: चांदोली अभयारण्यात वणवा; महिन्याभरातील दुसरी घटना...

धुराचे कल्लोळ परिसरभर पसरले होते. या आगीमध्ये डोंगररांगातील झाडे-झुडपे अनेक जीवजंतू, सरपटणारे प्राणी, जळून खाक होत असून वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे.

विजय पाटील

सांगली: सांगली जिल्ह्यातील (Sangali District) शिराळा तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या चांदोली बुद्रुक येथील जानाईवाडी नजीक असलेल्या डोंगरास आज दुपारी अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान होत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानजीक वणवा लागण्याची या महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे. वाऱ्याचा वेग भयाण असल्यामुळे तितक्याच वेगाने आग सगळीकडे पसरत होती.

धुराचे कल्लोळ परिसरभर पसरले होते. या आगीमध्ये डोंगररांगातील झाडे-झुडपे अनेक जीवजंतू, सरपटणारे प्राणी, जळून खाक होत असून वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. आग विझविण्यासाठी वन्यजीव विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने अथवा त्यासाठी लागणारी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्याने वन्यजीवचे कर्मचारी आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट; कर्जमुक्ती योजनेतील पहिली मोठी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT