Sand boa Snake : अकोल्यात मांडूळ सापाची तस्करी; एकाला अटक जयेश गावंडे
महाराष्ट्र

Sand boa Snake : अकोल्यात मांडूळ सापाची तस्करी; एकाला अटक

सदर आरोपीकडून 3 किलो 300 ग्राम वजनाचा मांडूळ जप्त करण्यात आला आहे. या मांडुळाची लांबी 43 इंच असून रूंदी व गोलाई 8 इंच आहे. तसेच या मांडुळाची अंदाजे किंमत 5 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बाळापुर जवळ काही इसम मांडूळ सापाची बेकायदेशीर पणे तस्करी करून खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते.

हे देखील पहा :

यासंदर्भात पोलिसांना सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला असता काही जण घटनास्थळावरून पळून गेले. तर एकाला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी अनिल बंडू देशमुख (वय 44) राहणार माटरगाव जिल्हा बुलढाणा यास अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपीकडून 3 किलो 300 ग्राम वजनाचा मांडूळ जप्त करण्यात आला आहे. या मांडुळाची लांबी 43 इंच असून रूंदी व गोलाई 8 इंच आहे. तसेच या मांडुळाची अंदाजे किंमत 5 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपी विरुद्ध वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत पोलीस स्टेशन बाळापूर येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीतील कचरा डेपोला भीषण आग; ११ अग्निशमन गाड्यांकडून आग विझवण्याचे प्रयत्न

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT