Sana Khan Case Saam TV
महाराष्ट्र

Sana Khan Case: सना खान बेपत्ता प्रकरणी मोठी अपडेट; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस

जबलपूरमधून तपासादरम्यान एक मॅरेज सर्टिफिकेट समोर आले असून त्यानुसार एप्रिल 2023 मध्ये सना खान आणि अमित शाहू या दोघांचे कोर्ट मॅरेज झाले होते.

साम टिव्ही ब्युरो

Nagapur Crime News: नागपुरातील भाजप पदाधिकारी सना खान गेल्या आठवड्यापासून बेपत्ता आहेत. नागपूर पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत असून एकाला अटक करण्यात आलीये. अशात आता सना खान यांचे मॅरेज सर्टीफीकेट समोर आले आहे. (BJP Sana Khan Case)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरातील भाजपच्या पदाधिकारी सना खान यांनी काही महिन्यांपूर्वी जबलपूरमधील व्यवसायिकासोबत कोर्ट मॅरेज केले होते. जबलपूरमधून तपासादरम्यान एक मॅरेज सर्टिफिकेट समोर आले असून त्यानुसार एप्रिल 2023 मध्ये सना खान आणि अमित शाहू या दोघांचे कोर्ट मॅरेज झाले होते.

दरम्यान, सना खान यांच्या भावाने या कोर्ट मॅरेज बद्दल आम्हाला माहिती नाही, असं म्हटलं आहे. मात्र, या मॅरेज सर्टिफिकेटवर साक्षीदार म्हणून ज्यांचे नाव आहे, त्याबद्दल सना खानच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे.

या प्रकरणी सना खान यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या भावांनी केला आहे. तसेच सना यांचा मित्र अमित शाहूनेच त्यांची हत्या करुन मृतदेह नदीत फेकून दिला, असा आरोप भावांनी केलाय. अमित शाहू जबलपूरमधील हॉटेल व्यवसायिक आहे. जबलपूर पोलिसांनी त्याच्या नोकराला ताब्यात घेतलंय. कार धुताना मला त्यात रक्त दिसलं होतं, असं नोकराने पोलिसांना सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT