Samruddhi Highway accident  Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वरील भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; अपघात नेमका कसा झाला? ड्रायव्हरनेच सांगितलं...

Samruddhi Mahamarg Chhatrapati Sambhajinagar Accident News : दर्शन घेऊन परत येत असताना समृद्धी महामार्गावर अगरसायगाव परिसरात हा भीषण अपघात झाला.

डॉ. माधव सावरगावे

Samruddhi Highway Accident :

समृद्धी महामार्गावर अपघातांचा मालिका सुरुच आहे. आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण जखमी आहेत.

मिनी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात मिनी बसचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे. त्याच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात नेमका कसा झाला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. समृद्धीवरील टोल नाक्याजवळ एक ट्रक अचानक समोर आला, अशी माहिती ड्रायव्हरने दिल्याचं पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी सांगितलं. ट्रक कमी वेगात होता की थांबला होता याबाबत पोलीस तपास करत आहेत. (Latest Marathi News)

समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनीच हा ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक अचानक आमच्या समोर थांबला. आरटीओने अचानक थांबवल्याने ट्रकही थांबला. मात्र वेगात असलेली आमची बस यामुळे ट्रकला धडकली. यामध्ये समोरील ट्रक आणि आरटीओची चूक असल्याचा आरोप प्रवाशाने केला आहे.

अपघात नेमका कसा झाला याबाबत सविस्तर चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया यांनी दिली आहे.

देवदर्शनाहून परतताना अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील इंद्रानगर येथे राहणारे जवळपास 35 भाविक खाजगी टम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना समृद्धी महामार्गावर अगरसायगाव परिसरात हा भीषण अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT