Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: 'समृद्धी'वर अपघाताचे सत्र सुरूच! उभ्या टेम्पोला ट्रकची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Amravati Truck And Tempo Accident: अमरावतीमधील समृद्धी महामार्गावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. ट्रक- टेम्पोमध्ये झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

अमर घटारे, अमरावती

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर सतत अपघात होत आहेत. या महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली. अमरावतीमध्ये समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा तपास अमरावती पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमध्ये समृद्धी महामार्गावर उभ्या टेम्पोला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात टेम्पोच्या चालकासह वाहकाचा जागीच मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाढोना गावाजवळ आज सकाळी हा अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये दोन्ही ट्रक आणि टेम्पोचा चक्काचूर झाला आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोघांच्याही शरीराचे अक्षरश: तुकडे झाले. त्यांच्या शरीराचे तुकडे समृद्धी महामार्गावर इकडे तिकडे पडले होते. या अपघाताची माहिती मिळतात तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. उत्तरीय तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Tourist Spots: मुंबई-पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' बेस्ट वीकेंड डेस्टिनेशनला द्या भेट

Maharashtra Live News Update: मुंबईच्या अंधेरी MIDC परिसरात सीप्ज कंपनीला भीषण आग

Oracle Layoff: कामावर येऊ नका; एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं | VIDEO

Toll Price Hike: प्रवास महागला! महाराष्ट्रातील टोलच्या दरात मोठी वाढ, आता किती पैसे मोजावे लागतील ?

एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, शिवसेनेत वेगवान हालचाली; श्रीकांत शिंदेंसह ३९ नेत्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT