Samruddhi Mahamarg Accident Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; चालकाचा ताबा सुटला अन् भरधाव कार उलटली, ४ जण जखमी

Samruddhi Mahamarg Accident News : आज, रविवारी सोमठाणा हद्दीत कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Accident News : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. तेव्हापासून अपघातांचे प्रमाण कमी होण्याचे नावच नाही. समृद्धी महामार्ग अपघाताचा सापळा ठरत आहे.

आज, रविवारी सोमठाणा हद्दीत कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चालकासह दोन मुलं जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर अपघाताची शृंखला सुरूच आहे. आज बदनापूर तालुक्यातील सोमठाणा हद्दीत कार चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. यामुळे कार लेनमध्ये जाऊन उलटली. या अपघातात (Accident) कार चालक अमोल वसंत भारंबे, छोटा मुलगा संचित, वैष्णवी भारंबे आणि मोहिनी भारंबे हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

समृद्धी महामार्गावर कारचा अपघात झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघात जखमी झालेल्या चौघांना कारमधून बाहेर काढण्यात यश आले आहे. या अपघातात जखमी झालेल्या चौघांना जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातांना नंतर पोलिसांनी क्रेनच्या माध्यमातून कार समृद्धी महामृगाच्या एका बाजूला काढून ट्रॅफिक सुरळीत केली आहे.

समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची मागून धडक; तिघांचा जागीच मृत्यू

वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात काल, शनिवारी समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री साडे बारा वाजता दरम्यान घडला.

डॉक्टर ज्योती क्षीरसागर,डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे, भरत क्षीरसागर अशी मृतकाची नाव आहे. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी पोहचत वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT