Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Latest News: वाढत्या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबणार? याचिका दाखल, कोर्ट काय निर्णय घेणार?

samruddhi mahamarg latest news in marathi: समृद्धी महामार्गावर अपघात होत असल्याने येथील वाहतूक थांबवण्याची मागणी याचिकेमार्फत कोर्टात करण्यात आली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

samruddhi mahamarg latest news in marathi:

वाढत्या अपघातामुळे राज्यातील अनेकांच्या तोंडी समृद्धी महामार्गाचं नाव आहे. गेल्या काही महिन्यांत समृद्धी महामार्गावर झालेल्या विविध अपघातात अनेकांनी गमावले आहेत. त्यामुळे या महामार्गाची दहशत अनेकांच्या मनात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामार्गावरून जाणे अनेकांना भीतीदायक वाटू लागले आहेत. याचदरम्यान, समृद्धी महामार्गावर अपघात होत असल्याने येथील वाहतूक थांबवण्याची मागणी याचिकेमार्फत कोर्टात करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

समृद्धी महामार्गावरून जाणारी वाहने सुसाट धावतात. त्यामुळे वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने काही चालक वाहनावरील नियंत्रण गमावतात. गेल्या महिन्यात १ जुलै रोजी खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात २६ जणांना जीव गमवावा लागला होता. या अपघातामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

अशाच प्रकारच्या वाढत्या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबवण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गावर अपघात होत असल्याने वाहतूक थांबवण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. वाहतूक थांबवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

यानंतर नागपूर खंडपीठाने MSRDC आणि राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. नागपूर खंडपीठाच्या नोटिशीला ४ आठवड्यात उत्तर सादर करण्याची वेळ दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. वाहतूक थांबवण्याची याचिकेत मागणी केल्यानंतर कोर्ट काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

समृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढणाऱ्यांवर कारवाई होणार

तत्पूर्वी, समृद्धी महामार्गावर रील्स आणि फोटो काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या महामार्गावर फोटो आणि रील्स न काढण्याबाबत वाहतूक पोलिसांनी आदेश जारी केले आहेत.

या आदेशाचे पालन न करणाऱ्यांना 500 रुपये दंड आणि एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या आदेशानुसार, आता समृद्धी महामार्गावर फोटो आणि रील्स काढणं महागात पडू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT