Damaged vehicles seen at the accident spot on Samruddhi Expressway near Jamwadi in Jalna district. Saam tv
महाराष्ट्र

Jalna Accident: समृद्धी महामार्गावर अपघात नाहीच, ती फक्त अफवाच

Jalna Samruddhi Mahamarg Accident: जालना येथील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आले होते. पण ही अफवाच असल्याचे समोर आले.

Bharat Jadhav

Jalna Samruddhi Expressway Accident: मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावर दर दिवसाआड अपघात होतोय. सोमवारीही जालन्याजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. हे वृत्त जालना आणि संभाजीनगरमध्ये वाऱ्यासारखे पसरले. अनेकांनी कोणतीही पृष्टी न करता सोशल मीडियावरील मेसेज व्हायरल केला. पण जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर अपघात झालाच नाही, ती फक्त अफवा होती.

समृद्धी महामार्गावर जालन्यामध्ये अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. जालन्यामध्ये सोमवारी सायंकाळी समृद्धीवर एक छोटा अपघात झाला होता. स्थानिकांचा गैरसमज झाला. त्यांनी भयंकर अपघात झाल्याचे म्हणत सोशल मीडियावरून घटना व्हायरल केली. पण समृद्धी महामार्ग आणि प्रसासकीय अधिकाऱ्यांची याबाबत संपर्क साधला असता त्यांनी हे वृत्त फेटाळले. त्यामुळे हे वृत्त फक्त अफवाच असल्याचे समोर आले.

समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीकच्या समृद्धी महामार्गावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला अपघात झाला होता. कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. सुदैवाने अपघातावेळी प्रतापराव जाधव कारमध्ये नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातामध्ये तिघे जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर सोडल्यानंतर त्यांचे अंगरक्षक, सहकारी आणि कारचालक हे मेहकरच्या दिशेने जात होते. त्यावेळी समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारला भयंकर अपघात झाला. कारने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT