Samruddhi Mahamarg Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, दुभाजकाला धडकून कारचा चुराडा

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, दुभाजकाला धडकून कारचा चुराडा

साम टिव्ही ब्युरो

>> मनोज जयस्वाल

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गवर पुन्हा एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. नागपूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात झालेल्या या अपघातात ही कार कार दुभाजकाला चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

कार दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची घटना वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील चॅनल नंबर 235 वर घडला आहे. या धडकेत कार मधील चार जण जखमी झाले आहेत.

ही धडक इतकी भयंकर होती की, गाडीच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले राजेश पांडे (35 वर्ष ) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत व पायाला किरकोळ दुखापत झाली तर आकाश नागदेव ( 42 वर्ष ) हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. (Latest Marathi News)

सईत भरधाव कारची दुचाकीला धडक

दरम्यान, आज वसई पूर्वेच्या फादरवाडी येथे एका भरधाव इनोवा कार आणि दुचाकीमध्ये हा अपघात झाला असून इनोव्हाच्या धडकेत दोन दुचाकी स्वार तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 वसई (Vasai) पूर्वेच्या फादरवाडी येथे एका भरधाव इनोवा कारच्या धडकेत दोन दुचाकी स्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात (Accident) झाला. दुचाकीवरील दोन तरुण दुचाकीत पेट्रोल भरून तुंगारेश्वर मंदिराकडे जात होते. यावेळी फादरवाडी नाक्याजवळ एका भर वेगात येणाऱ्या इनोव्हा कारने या दोघांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर इनोव्हाचा चालक फरार झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT