Samruddhi Highway Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ऑफिसमध्ये जाताना तरुणीवर काळाचा घाला

Accident News: कारला कंटेनरने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Accident: महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघाताची शृंखला काही संपतासंपत नाहीये. आज पुन्हा समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय. कारला कंटेनरने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली आहे. (Latest Marathi News)

समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला असून कार चालक गंभीर जखमी आहे. कोलकत्ता येथील राहिवाशी ओइंद्रआर रॉय (वय 26 वर्ष) असं अपघातात ठार झालेल्या मुलीचं नाव आहे. मृत तरुणी पुण्यात नोकरी करत असल्याची माहिती समजली आहे.

अंशुल टाकळीकर असं वाहन चालकाचे नाव आहे. तो नागपूर येथील रहिवाशी असून शनिवारी सकाळी कारने तरुणीला ऑफिसमध्ये सोडवण्यासाठी जात होता. यावेळी अंशुल भरधाव वेगाने कार चालवत असताना वाहनावरील त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याची कार समोर असलेल्या कंटेनरला मागून जाऊन धडकली.

जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात जखमी झालेल्या एकाला तात्काळ जालना सामान्य रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातग्रस्त वाहन हायड्राच्या साह्याने एडमिन बिल्डिंग येथे लावण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, आता अपघातग्रस्त वाहन तेथून हालवल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर विरोधात ढाणकी शहर कडकडीत बंद

किडनी स्टोनच्या रुग्णांनी काय खावे आणि काय काय खाऊ नये?|Kidney Stone Diet Tips

Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Kaju Katli Recipe: खास कार्यक्रम किंवा सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट काजू कतली; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT