saam tv
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लुटमार; बुलढाण्यातून पाच जणांच्या टोळीला अटक

Samruddhi Expressway Robbery Gang : वाशिमच्या कारंजा हद्दीतील समृद्धी महामार्गावर लूटमार होती होती. प्रवाशांना तलवार आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटण्यात येत होतं. प्रकरणात पोलिसांनी आंतरजिल्हा टोळीचा छडा लावला.

Bharat Jadhav

  • बुलढाणा जिल्ह्यातून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.

  • प्रवाशांना तलवार आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटायचे

मनोज जैस्वाल, साम प्रतिनिधी

वाशिमच्या कारंजा हद्दीतील समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लुटमार करणाऱ्या टोळीला बुलढाण्यातून अटक करण्यात आलीय. प्रवाशांना तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून लूटलं जातंय. लुटमार करणाऱ्या या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांना यश मिळवले आहे. या कारवाईत बुलढाणा जिल्ह्यातून पाच आरोपींना अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन, दोन बनावट पिस्तुले, लोखंडी रॉड, पाच मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार राज्यातील बँक व्यवस्थापक प्रशांत युधिष्ठिर रंजन हे दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावरून रायपूरकडे जात होते. पहाटे तीनच्या सुमारास कारंजा लाड परिसरात थकवा आल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून विश्रांती घेतली.

त्याचवेळी चार आरोपींनी तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवत त्यांच्याकडील 5 हजार रुपये रोख व दोन ग्रॅम सोन्याचे कानातले असा सुमारे १५ हजार रुपयांचा ऐवज लुटून पलायन केले. स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे हर्षद पांडुरंग साबळे याला प्रथम ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून चेतन संजय माने, ओम सुरेश सपकाळ, धनंजय उजालसिंग कमळीकर आणि गोपाल श्रीकिसन मोरे या साथीदारांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सर्व आरोपींना अटक केली.

आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम, हुंडाई व्हर्ना कार, गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड, दोन बनावट पिस्तुले आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT