Samruddhi Mahamamarg News Saamtv
महाराष्ट्र

Samruddhi Highway News: ...तर तुमच्या वाहनाला नो एन्ट्री; 'समृद्धी' महामार्गावर प्रवास करण्याआधी हे वाचा!

Samruddhi Mahamarg Accident Reason: समृध्दी महामार्गावरील बहुतांशी अपघात (Accident) हे वाहनांचे टायर फुटल्यामुळे होत आहेत.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, प्रतिनिधी...

Samruddhi Expressway News: समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला झाल्यापासून त्यावर अपघातांची मालिकाच सुरू आहे. समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांनी सर्वांचीच चिंता वाढवली आहे. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक प्रशासनाकडून वेळोवेळी वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

ही वाढत्या अपघातांची मालिका लक्षात घेता समृद्धी महामार्गावर आजपासून टायर तपासूनच वाहन सोडले जाणार आहे. या वाहन तपासणी केंद्राचे आज परिवहन आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन झाले. (Samruddhi Highway Latest News)

गाड्यांच्या टायरची होणार तपासणी....

याबाबत अधिक माहिती अशी की, समृध्दी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी आणि नागपूर अशा दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. समृध्दी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंज येथील टोलनाक्यावर आज परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांच्या हस्ते टायर तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

टायर फुटल्यामुळेच जास्त अपघात...

या टायर तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची मोफत तपासणी केली जाणार आहे. समृध्दी महामार्गावरील बहुतांशी अपघात (Accident) हे वाहनांचे टायर फुटल्यामुळे होत आहेत. त्यामुळे अशा अपघातांना आळा बसावा यासाठी महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचा हा उपक्रम सुरू केला आहे.

या सुविधा मोफत....

या तपासणी दरम्यान टायरमध्ये त्रुटी आढळणाऱ्या वाहनांना समृद्धीवर आता नो इन्ट्री असणार आहे. दरम्यान, या उपक्रमा अंतर्गत वाहनधारकांना नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पिन चेक आणि रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरूस्ती, टायर वेअर , चेक यंत्राचे वितरण या टायर तपासणी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT